¡Sorpréndeme!

Bhaskar Jadhav | मंत्री भास्कर जाधव पालखी नाचवताना तल्लीन |

2022-03-18 111 Dailymotion

Bhaskar Jadhav | मंत्री भास्कर जाधव पालखी नाचवताना तल्लीन |

दोन वर्षांच्या कोरोना काळानंतर कोकणात शिमगा उत्सव मोठ्या उत्साहात सुरू झाला आहे. कोकणातील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधवदेखील (Bhaskar Jadhav) दरवर्षीप्रमाणे त्यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव या गावी देहभान विसरून ग्रामदेवता श्री शारदादेवीची पालखी खांद्यावर घेऊन नाचवताना दिसले. आपल्या ग्रामदेवतेवर प्रचंड श्रद्धा असलेले आमदार जाधव हे काहीही झाले आणि कुठेही असले तरी नवरात्र उत्सवात शारदेच्या दरबारात पारंपरिक जाखडी नृत्य करण्यासाठी आणि शिमगोत्सवात पालखी नाचविण्यासाठी पोहोचतात. यंदाही गावाच्या सहाणेसमोर होम केल्यानंतर ग्रामस्थांसह ढोल-सनईच्या ठेक्यावर पालखी नाचविताना ते तल्लीन झाले होते.

#Kokan #Bhaskarjadhav #Chiplun #Ratnagiri #Marathinews #Maharashtranews